पिंपळगाव बाजार समितीत किसान थाळी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:01 PM2020-02-05T18:01:25+5:302020-02-05T18:01:50+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला.
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला. सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या किसान थाळी योजनेचे महत्त्व उपस्थित शेतकर्यांना सांगण्यात आले. तनिष्का बचत गटाकडून भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे, मिरचीची चटणी असे पदार्थ असलेली किसान थाळी दहा रु पयात शेतकर्यांना मिळेल. गोरगरीब शेतकर्यांना पोटभर जेवण मिळावे हाच या याजनेमागील असल्याचे सभापती दिलीप बनकर यांनी सांगितले. यावेळी अमृता पवार, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, प्रताप मोरे, अशोक शाह, जिल्हा उपनिबंधक बलसाने, शरद काळे, दीपक विधाते, रवींद्र मोरे, संजय मोरे, अजय गवळी,राजेंद्र डोखळे, तानाजी बनकर, अजित संगमनेर, अल्पेश पारख आदी उपस्थित होते.