किसान रेल्वेने पहिल्याच दिवशी २२५ टन माल रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:22+5:302021-08-25T04:20:22+5:30
चौकट किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान ...
चौकट
किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ वाजता व नाशिक रोड रेल्वेस्थानकातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी शेतातून शेतीमाल काढून दुपारी पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर पोहोचवणे शक्य होते. मंगळवारी सायंकाळी सुटणारी किसान रेल्वे गुरुवारी पहाटे ४ वाजता बिहारला पोहोचत होती. त्यानंतर मार्केट सुरू होत असल्याने तत्काळ ताजा शेतीमाल तेथे मिळत होता. मात्र आता सकाळी साडेअकरा वाजता किसान रेल्वेचा वेळ केल्याने शेतकऱ्यांना आदल्या दिवशी शेतीमाल शेतातून काढून पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर आणून द्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतीमाल रात्रभर रेल्वेस्थानकावर राहणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी किसान रेल्वे मध्ये भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता बिहारला पोहोचणार आहे. त्यामुळे तेथेदेखील रात्रभर शेतीमाल पडून राहणार आहे. किसान रेल्वेची वेळ बदलल्याने २४ ते ३० तास उशिरा शेतीमाल पोहोचणार असल्याने ताजा माल मिळणार नाही. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.