चांदवड नगर परिषदेवर किसान सभेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:59+5:302021-07-01T04:11:59+5:30
चांदवड : नगर परिषद हद्दीतील शासनाने दिलेल्या इंदिरा आवास योजनेचे घरकुल बेकायदेशीर ठरवून नोटीस देऊन ...
चांदवड : नगर परिषद हद्दीतील शासनाने दिलेल्या इंदिरा आवास योजनेचे घरकुल बेकायदेशीर ठरवून नोटीस देऊन पाडण्याचे प्रयत्न आहेत. सदरचे आदेश त्वरित रद्द करावेत या व इतर मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा चांदवड नगर परिषदेच्या कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, शब्बीर सय्यद, रूपचंद ठाकरे, गणपत गुंजाळ, ताईबाई पवार, नामदेव पवार, यादव गोधडे, अब्बास शेख यांच्या शिष्टमंडळाने केले. मोर्चा बसस्थानक, बाजारवेस, सोमवारपेठ, शिवाजी चौक, श्रीरामरोडमार्गे चांदवड नगर परिषद कार्यालयावर नेला. तेथे मुख्य अधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, चांदवड नगर परिषदेच्या हद्दीतील अतिक्रमित घरांचा सर्व्हे करून कायम करून घरपट्टी, पाणीपट्टी लागू करण्यात यावी, यात देवीहट्टी, लेंडीहट्टी, हनुमाननगर, बुखारी बाबानगर, तळवाडे रोड, घोडकेनगर, राशेवाडी, पाचवड वस्ती, कोंबडवाडी, सोमवार हट्टी, शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे लागू करण्यात यावी, पाचवड वस्ती, देवी रस्ता, पाणी, वीज इत्यादी सेवा उपलब्ध करून द्याव्यात. यावेळी कारभारी माळी, शंकर गवळी, शिवाजी माळी, शांताराम पवार, बाबू वाघ, समाधान वाघ, सुनील सोनवणे, हरी सोनवणे, केशव माळी आदींसह महिला, पुरुष सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन राठोड, पोपट कारवाल व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
---------------------------------------------
फोटोची ओळ 30 एम.एम.जी.2- चांदवड नगर परिषदेच्या कार्यालयावर किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा.
===Photopath===
300621\30nsk_16_30062021_13.jpg
===Caption===
३०एमएमजी २