चांदवड प्रांत कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 06:12 PM2018-12-13T18:12:10+5:302018-12-13T18:12:16+5:30
चांदवड : अखिल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष कॉ. हनुमंत गुंजाळ, कॉ.राजाराम ठाकरे, कॉ. तुकाराम गायकवाड, कॉ. रामराव पारधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते, महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र जमून घोषणा देत प्रांत व तहसीलदार कार्यालयावर गेले. मोर्चाचे रूपांतर पुढे सभेत झाले.
चांदवड : अखिल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष कॉ. हनुमंत गुंजाळ, कॉ.राजाराम ठाकरे, कॉ. तुकाराम गायकवाड, कॉ. रामराव पारधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते, महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र जमून घोषणा देत प्रांत व तहसीलदार कार्यालयावर गेले. मोर्चाचे रूपांतर पुढे सभेत झाले. यावेळी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, वनकार्यालयातील दावे मंजूर करून पात्र करण्यात यावेत, आदिवासींना तात्काळ सौरऊर्जेेचे कंदील देण्यात यावेत, वनजमिनीत राहणाऱ्या कुटुंबाचा सर्व्हे करून त्यांची नावे ‘ड’ यादीत समाविष्ट करून त्याच जागेवर घरकुल मंजूर करावे, गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे करण्यात याव्या, आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, गरीब गरजू लोकांना नवीन रेशनकार्ड व विभक्त रेशनकार्ड तत्काळ देण्यात यावे, अंत्योदय बीपीएल कार्डवर ३५ किलो धान्य मिळावे या मागण्यांचा समावेश होता. मोर्चात कॉ. दौलत वटाणे, कॉ. नंदाबाई मोरे, तुळशीराम धुळे, शब्बीर सय्यद, बाळू सोनवणे, शंकर गवळी, सुरेश चौधरी, नाना पवार, दत्तू भोये, शिवाजी सोनवणे, हनुमान मोरे, तुकाराम बागुल, सुरेश पवार, साहेबराव गांगुर्डे, शिवाजी माळी, ताईबाई पवार, कारभारी माळी, गणपत गुंजाळ, छबू कडाळे, रूपचंद ठाकरे आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.