नार-पारच्या पाण्यासाठी किसानसभा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:50 PM2018-08-06T14:50:29+5:302018-08-06T14:50:39+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्याला नार - पार प्रकल्पाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्यासाठी गट - तट सोडून एक होवून लढल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी साकोरा येथिल किसान सभेत केले.
साकोरा : नांदगाव तालुक्याला नार - पार प्रकल्पाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्यासाठी गट - तट सोडून एक होवून लढल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी साकोरा येथिल किसान सभेत केले. साकोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य किसान सभेची जनजागृती सभा पार पडली.भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी जनजागरण मोहीम सद्या राबविण्यात येत आहे.याप्रसंगी नार - पार प्रकल्पाचे पाणी नांदगाव तालुक्याला मिळाले पाहिजे, या मागणीसाठी तसेच भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, वयोवृद्ध व शेतमजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या करीत जनजागृतीसाठी साकोरा येथे जनजागरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली.यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.भास्कर शिंदे,राज्य सचिव मंडळाचे कॉ.राजू देसले, अध्यक्ष कॉ. देवचंद सुरसे, कुसुम गायकवाड, किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, अॅड.दत्तात्रय गांगुर्डे, अॅड. साधना गायकवाड, कॉ.जयराम बोरसे, कॉ.देविदास भोपळे, राजेंद्र निकम, रतन बोरसे, रमेश बोरसे, शिवाजी बच्छाव आदिंसह परिसरातील गावकरी मंडळी उपस्थित होती.