मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:45 PM2018-12-26T17:45:36+5:302018-12-26T17:45:51+5:30
मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान या नियुक्तीला भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी विरोध दर्शवला असून, महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दादा जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
बोर्डे यांनी यापूर्वी औरंगाबाद महापालिकेत उपायुक्तपदी तसेच मालेगाव महापालिकेत १ सप्टेंबर २०१५ ते ४ मे २०१६ या आठ महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते सध्या नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. बुधवारी त्यांची बदली करण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी रूजू होण्याचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहे. दरम्यान, बोर्डे हे राजकीय दबावाला बळी पडणारे आहेत. त्यांचा पारदर्शक कारभार नसल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या अधिकाºयाची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी शासनाकडे केली होती; मात्र शासनाने बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. कर्तव्य कठोर आयुक्त संगीता धायगुडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.