चॉपर दाखवून लूट करणाऱ्या दोघांच्या बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 01:05 AM2020-12-03T01:05:22+5:302020-12-03T01:06:55+5:30

रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्ती व दुचाकीस्वार यांना निर्जन रस्त्यांवर एकटे गाठून धारदार चॉपरसारख्या शस्राचा धाक दाखवून मोबाइल, रोकड बळजबरीने काढून जबरी चोरी करणाऱ्या दोघा लुटारूंना वडाळागावात बेड्या ठोकण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

Kissing tied of the two robbers showing off the chopper | चॉपर दाखवून लूट करणाऱ्या दोघांच्या बांधल्या मुसक्या

चॉपर दाखवून लूट करणाऱ्या दोघांच्या बांधल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देवडाळ्यात सापळा : जबरी लुटीचे तीन, तर एक चोरीचा गुन्हा उघड

नाशिक : रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्ती व दुचाकीस्वार यांना निर्जन रस्त्यांवर एकटे गाठून धारदार चॉपरसारख्या शस्राचा धाक दाखवून मोबाइल, रोकड बळजबरीने काढून जबरी चोरी करणाऱ्या दोघा लुटारूंना वडाळागावात बेड्या ठोकण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

लॉकडाऊन शिथिल होताच शहरात चोरी, जबरी चोरी, लूटमार यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धारधार शस्राचा धाक दाखवून बळजबरीने दागिने, मोबाइल, रोख रक्कम हिसकावून घेण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर गुन्हे शाखांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेत अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्याचा ‘टास्क’ सोपविला. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने उपनगर, मुंबई नाका, पंचवटी या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यास सुरुवात केली असता मिळालेल्या गोपनीय माहिती, मोबाइल लोकेशनवरून संशयित निलगिरीबाग, वडाळागाव, भारतनगर झोपडपट्टी भागातील असू शकतात असा कयास पथकाकडून लावण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दोन पथके तयार केली. त्यानुसार पथकांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता चोरट्यांचे अंतिम मोबाइल लोकेशन वडाळागावात असल्याचे समजले. यानुसार कोल्हे, सहायक निरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने मंगळवारी (दि.१) सापळा रचला. यावेळी वडाळ्यातून पोलिसांनी संशयित अक्षय ऊर्फ आकाश सुरेश चिल्लारे (१९, रा. हनुमान चौक) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यास खाकीचा हिसका दाखविला असता त्याने त्याचा साथीदार युनूस अय्युब शहा याच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. पथकाने गोपनीय माहिती घेत पुन्हा सापळा रचला. युनूस हा रिक्षाथांब्यावर येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चॉपर, मोबाइल, रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या दोघांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्यांची कसून चौकशी केली असता जबरी लुटीचे तीन, तर चोरीचा एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पथकामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Kissing tied of the two robbers showing off the chopper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.