नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून ‘कळसुबाई’ सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 03:28 PM2017-08-22T15:28:20+5:302017-08-22T16:23:06+5:30

Kisubai Sir from Nashik's five-year Adiba | नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून ‘कळसुबाई’ सर

नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून ‘कळसुबाई’ सर

Next
ठळक मुद्दे सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर ‘वज्र वर्ल्ड रिकॉर्ड’ लिटर किंग्डम या इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी

नाशिक : अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर (सुमारे साडे पाच हजार फूट ) पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या जानेवारी महिन्यात सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने अदिबाला गौरविण्यात आले आहे.
नाशिकमधील वडाळारोडवरील हिरवेनगरमधील रहिवासी व लिटर किंग्डम या इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी अदिबा आरिफ खान या चिमुरडीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला ४०गिर्यारोहकांच्या समुहासोबत कळसुबाई सर केले होते. त्यानिमित्त नुकतेच आंध्रप्रदेशमधील विशाखापटट्णमच्या विविध विश्वविक्रमांची नोंद करणाºया संस्थेने ‘वज्र वर्ल्ड रिकॉर्ड’ पुरस्कार अदिबाला अदिबाला प्रदान केला आहे.

 

 

Web Title: Kisubai Sir from Nashik's five-year Adiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.