खाद्यतेल महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:23+5:302021-04-06T04:13:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या हातात रोजगार नसताना रोज आवश्यक असणाऱ्या खाद्यतेलाचे दर ...

The kitchen budget has collapsed due to the rise in edible oil prices | खाद्यतेल महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

खाद्यतेल महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या हातात रोजगार नसताना रोज आवश्यक असणाऱ्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. एक किलो खाद्यतेलासाठी सुमारे १२५ ते १८० रुपये मोजावे लागत असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वयंपाकघरात रोजच लागणाऱ्या किराणा मालापैकी शेंगदाणे, खाद्यतेल व डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसाधारण कुटुंबाचे महिन्याचे आर्थिक बजेट यामुळे पुरते कोलमडले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहेत तर अनेक हातांना काम नसल्याने घर चालविणे अवघड झाले आहे. किरकोळ मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने इतर उद्योगधंद्यांसह शेती व्यवसायालाही याचा फटका बसत आहे.

सध्या शेतमजुरीचे दर महिलांसाठी ३०० तर पुरुषांना ३५० रुपये दर देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत महागाईच्या नावाने ओरड सुरू आहे. मार्च, एप्रिल हे महिने हिंदू वर्षातील सर्वाधिक सणावळीचे असल्याने हे सण साजरे करताना सर्वसामान्य कुटुंबांना ऋण काढून सण साजरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणखी महिनाभर अशीच भाववाढ होत राहिली तर अशी वेळ सर्वसामान्य कुटुंबावर येण्याची भीती व्यक्त होत आहे.

दर आणखी वाढणार

दर आठवड्याला किराणा मालाचे दर वाढत आहेत. यात खाद्यतेलाचे दर झपाट्याने वाढत असून,यात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. तर रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या डाळींची मोठ्या प्रमाणावर भाववाढ होत असल्याने सामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.

खाद्यतेलाचे प्रकार

शेंगदाणा : १७० ते १८०

सोयाबीन : १३५ ते १४०

सूर्यफूल : १४५ ते १५०

रिफाइंड : १२० ते १२५

कोट -

किराणा मालाच्या वाढत्या महागाईमुळे घर चालवणे कठिण झाले आहे. रोजंदारीवर काम करून घर चालविताना मोठी कसरत करावी लागते. सरकारने गरिबांना गहू-तांदळासोबत खाद्यतेलही रेशनच्या माध्यमातून पुरवावे. याबाबत विचार व्हावा.

- अंजली पवार, गृहिणी

Web Title: The kitchen budget has collapsed due to the rise in edible oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.