पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:45+5:302021-07-05T04:10:45+5:30

१) असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (ग्राफ) पेट्रोल-डिझेल जानेवारी २०१८ जानेवारी २०१९ जानेवारी २०२० जानेवारी २०२१ फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ...

The kitchen collapsed at the rate of petrol-diesel; Groceries, vegetables are expensive | पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला

Next

१) असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (ग्राफ)

पेट्रोल-डिझेल

जानेवारी २०१८

जानेवारी २०१९

जानेवारी २०२०

जानेवारी २०२१

फेब्रुवारी

मार्च

एप्रिल

मे

जून

जुलै

चौकट-

वांगी ८० रुपये किलो

गवार - ९० रुपये किलो

सिमला मिरची -६०

भेंडी-५० गिलके -४५

कारले - ४५

काकडी - ३०

बटाटे- २० दोडका -६० टमाटा - २५

चौकट-

साखरेपेक्षा गूळ महाग

केंद्र सरकारने आयातीचे धोरण बदलले असल्यामुळे सध्या डाळींच्या दरात पाच-सहा रुपयांनी घसरण झाली आहे. खाद्यतेलाचे दरही थोडेफार उतरले असले तरी अद्याप ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्याचेच दिसते. मसाल्याच्या पदार्थांमध्ये सध्या तेजी असून गुळाचे दरही साखरेपेक्षा अधिक झाले आहेत.

चौकट-

ट्रॅक्टरची शेतही महागली

डिझेलच्या दराने नव्वदी पार केल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. नांगरणीचा दर सुमारे ५०० रुपयांनी तर रोटाव्हेटर मारण्याचा दरही ६०० ते ७०० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे जे शेतकरी ट्रॅक्टरचालकांकडून मशागत करून घेतात त्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

चौकट- घर चालविणे झाले कठीण

कोट-

कधी तेल स्वस्त होत तर कधी भाज्या महागतात. मागील वर्षभरापासून हेच सर्व सुरू आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत पगारामध्ये मात्र वाढ होत नाही. यामुळे दर महिन्याला घरखर्चासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये संपूर्ण महिना काढणे कठीण होऊन बसले आहे. - शालिनी जाधव, गृहिणी

कोट-

मागील वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. यामुळे आम्हाला रोज काम मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे दर महिन्याला घरात पैसा येईलच असे नाही. त्यामुळे आहे तो पैसा पुरवून पुरवून वापरावा लागतो. अशा काळात वाढत्या महागाईने तर घर कसे चालवायचे आणि मुलांचे शिक्षण कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - योगिता शर्मा, गृहिणी

कोट-

डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकदारांनी त्यांची दरवाढ केली आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने किराणा मालातील काही वस्तूंचे दर वाढले आहेत. किरकोळ दुकानदारांना अनेक वेळा उधारीवरही माल विकावा लागतो. त्याचाही त्रास होतो. - राजेंद्र अमृतकर, किराणा व्यापारी

कोट-

सध्या बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. मागणी वाढलेली असल्यामुळे भाजीपाल्याला उठाव चांगला असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. डिझेल दरवाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. अगदी बाजार समितीतून शहरातल्या शहरात भाजीपाला पोहोचवायचा असेल तरी वाहतूकदाराला ३०० ते ४०० रु भाडे द्यावे लागते. - दिनेश गायधनी, भाजीपाला विक्रेता ६) दोन व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया (एक भाजीपाला व्यापारी, एक किराणा)

Web Title: The kitchen collapsed at the rate of petrol-diesel; Groceries, vegetables are expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.