संक्रांतीसाठी पतंगनगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:35 PM2020-01-14T16:35:43+5:302020-01-14T16:35:56+5:30
येवला : यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज झाले असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते.
येवला : यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज झाले असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते.
येवल्यात तीन दिवस चालणाऱ्या पतंगोत्सवासाठी गावातले व्यवहारही अपवाद वगळता बंद असतात. जणू अघोषित बंदच असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपलं वय विसरून सारे पतंग उडविण्यात मग्न असतात. ढोलताशाच्या तालावर आणि ध्वनिक्षेपकाच्या ठणाणत्या आवाजात धुंद होऊन येवलेकर पतंग उडवत असतात, खेळत असतात. पतंगोत्सवाची मोठी खासियत येवलेकरांनी यंदाही मकरसंक्रांतीच्या तब्बल तीन दिवस चालणाºया पतंग उत्सवाची धूम उडविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आवडीचे बहुरंगी-बहुढंगी पतंग उडविण्यासाठी लागणारी येथील आसारी खरेदी करण्यासह पतंगासाठीचा मांजा सूतविण्याकरिता पतंगवेड्या येवलेकरांची सध्या चांगलीच लगबग दिसत आहे. डट्टा, कमान, आसारी यांसह गोंडेदार, मत्सेदार, कल्लेदार, अंडेदार, पट्टेदार अशा पतंगी... काही तरी विचित्र वाचतोय, असं वाटतंय ना ! पण तुम्ही वाचताय हे शब्द मराठीच आहेत. ते इतरत्र बोलले जात नसले तरी नाशिकजवळच्या येवल्यात मात्र सराईतपणे बोलले जातात. अर्थात ही भाषा आहे पतंगासंदर्भातली. पतंगोस्तवाची येवल्याची परंपरा काही खासच आहे. ती एकदा तरी अनुभवावी अशीच आहे.
तीन दिवस विविध आकाराच्या पतंगांनी व्यापून जाणारं परिसरातील अवघं आकाश अन् अरे दे ढिल.. ढिल देरे भय्या अशी आरोळीवजा साद घालतांना प्रतिस्पर्ध्याचा पतंग काटल्यावर दुमदुमणारा हा कर्णकर्कश आवाजही येथील पतंगोत्सवाची एक खासियतच.