सिगारेट आणण्यावरुन झालेल्या वादात चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:54 PM2021-05-29T16:54:49+5:302021-05-29T16:55:07+5:30
सुलतान सोडवण्यासाठी गेला असता सुमीत खरात याने हातातील चाकूने त्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : सिगारेट आणण्यावरुन झालेल्या वादात दोघा सराईत गुंडांनी मिळून एकास बेदम मारहाण करत चाकूने हातावर वार केल्याची घटना नाशिकरोडच्या गांधीनगर परिसरात गुरूवारी (दि.२७) रात्री घडली. अमोल खरात व सुमीत खरात (पुर्ण पत्ता नाही) अशी संशयितांची नावे ओहत. याप्रकरणी सुलतान बाबु शेख (२३, रा. नुराणी गल्ली, भारतनगर झोपडपट्टी, मुंबईनाका) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुरूवारी सुलतान याच्या भावास संशयितांनी सिगारेट आणण्यास सांगीतले त्याने नकार देताच संशयितांनी त्यास बेदम मारहण केली. सुलतान सोडवण्यासाठी गेला असता सुमीत खरात याने हातातील चाकूने त्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमा कार्यालयातून जनित्र लांबविले
नाशिक : गंगापुररोडवरील एका विमा कंपनीच्या कार्यालयाचा वाहनतळात बसविण्यात आलेले जनित्र अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार गंगापूर रोडच्या जेहान सर्कल परिसरात घडला आहे. याप्रकरणी हरिशचंद्र निकम (रा. इंद्रनगरी, कामठवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. हृषीराज टॉवर येथे तेजस फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयासाठी लागणारे जनित्र इमारतीच्या वाहनतळात ठेवण्यात आलेले होते. चोरट्यांनी सुमारे ४० हजार रूपये किंमतीचे भंगार अवस्थेत बंद पडलेले जनित्र २२ मे रोजी रात्री चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.