रंगबेरंगी साड्यांनी नटल्या द्राक्षबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 06:21 PM2020-01-07T18:21:08+5:302020-01-07T18:21:47+5:30

धुक्यापासून बचाव : बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

 Knitted grapes with colorful sarees | रंगबेरंगी साड्यांनी नटल्या द्राक्षबागा

रंगबेरंगी साड्यांनी नटल्या द्राक्षबागा

Next
ठळक मुद्देऔषध फवारणी च्या खर्चात वाढ झाल्याने अडचणीत आणखीणच भर

मानोरी : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तपमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुक्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागा अडचणीत सापडल्या असून बागा वाचविण्यासाठी शेतकरी नाना त-हेचे प्रयोग करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या सर्वत्र रंगबेरंगी साडड्यांनी नटलेल्या द्राक्षबागा दिसून येत आहे.
महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणी च्या खर्चात मोठ्य प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीणच भर पडली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अनेक द्राक्ष उत्पादक ढगाळ वातावरणामुळे विवंचनेत सापडले आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बागेला फळ लागले असून पुढच्या पंधरा ते वीस दिवसात ही द्राक्षे तोडणीला येणार आहेत. मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी परिस्थितीत अनेक शेतकरी वर्गाने आपले द्राक्ष बागांवर कुºहाड चालवून द्राक्ष बागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकरी वर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच या द्राक्ष बागेचे उत्पादन निघत असल्याने शेतकरी वर्गाला द्राक्ष बागे जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरण बदल होत असले तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करून द्राक्ष बागा जगविण्यात येत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने द्राक्ष उत्पादकांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या भीतीने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पसरत असल्याने द्राक्ष बागेतील फळे वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मानोरीतील शेतकरी वर्ग दाट धुक्यातून द्राक्ष फळे वाचवण्यासाठी बागेभोवती साड्या बांधत असल्याचे दिसून येत आहे.  या वातावरण बदलाचा परिणाम द्राक्ष विक्रवर होण्याची शक्यताही द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

Web Title:  Knitted grapes with colorful sarees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.