औद्योगिक वसाहत वायुप्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Published: November 12, 2016 12:48 AM2016-11-12T00:48:47+5:302016-11-12T00:45:56+5:30

धुलीकणांचे प्रमाण जास्त : संकेतस्थळावर महिन्यापूवीर्ची आक डेवारी

Knowledge of industrial colonization of air pollution | औद्योगिक वसाहत वायुप्रदूषणाच्या विळख्यात

औद्योगिक वसाहत वायुप्रदूषणाच्या विळख्यात

Next

नामदेव भोर नाशिक
देशाची राजधानी नवी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असताना नाशिक शहरातही वेगळी स्थिती नाही. नाशिक शहरात दिल्ली एवढी भीषण परिस्थिती नसली तरी औद्योगिक क्षेत्र वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ या विषयावर गंभीर नाही.
खासगी सूत्रांकडून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण वाढत असल्याचे सांगितले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या दोन महिन्यांची प्रदूषणाची आकडेवारी संकेतस्थळावर अद्ययावत केलेली नाही.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात धुलीकणांचे प्रमाण अधिक असल्याचे काही दिवसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील एसपीएम (सस्पेंड पार्टिकुलेट मॅटर- यात १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांसह मोठ्या धुलीकणांचा समावेश होतो) मोठ्या प्रमाणात वाढले असून संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार वातावरणातील एसपीएमच्या घटकांनी प्रदूषण मापनाच्या प्रत्येकवेळी कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. तर रहिवासी परिसरात आॅगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार १० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांचे म्हणजे श्वसनातून शरीरात पोहोचणाऱ्या हानिकारक घटकांचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षी आॅगस्ट महिन्यात १६ वेळा वातावरणातील वायुप्रदूषणाची तपासणी करण्यात आली. यात नऊ वेळा वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये वातावरणातील धुलीकणांचे अर्थात आरएसपीएमचे किमान प्रमाण ८८ एम क्युबपर्यंत पोहोचले असून कमाल प्रमाणाने तब्बल १६१ एमक्युबचा टप्पा गाठला आहे. तर हे प्रमाण जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत किमान १४ एमक्युबपर्यंत असेले तरी कमाल प्रमाणाने २८० एमक्युबचा निर्देशांक गाठला होता. या वर्षभरात सुमारे ५५ दिवसांत वायुप्रदूषणातील आरएसपीएम प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ सातपूर औद्योगिक वसाहतीच्या भागात वर्षभरात २१ वेळा धुलीकणांनी मर्यादा ओलांडली होती. सोबतच एसपीएमची मर्यादा सातत्याने नियोजित मर्यादेपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. तर २०१४ वर्षात २२५ वेळा करण्यात आलेल्या प्रदूषण मापनात तब्बल ३२ वेळा आरएसपीएमचे प्रमाण १०० एमक्युपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी शुक्रवारी (दि.११) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरएसपीएम प्रमाणापेक्षा म्हणजेच १०० एमक्युबपेक्षा तब्बल ३१.७९ एवढे अधिक असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून स्पष्ट होते.
याधुलीकणांच्या प्रदूषणांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून नोंदच होत नसल्याने अधिकाऱ्यांकडून शहरातील प्रदूषणाकडे डोळेझाक होत असल्याचे स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Knowledge of industrial colonization of air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.