कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांवर आधारित देखावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:38 AM2019-09-10T00:38:58+5:302019-09-10T00:39:19+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको : दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको व अंबड भागांत दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने यंदा शंभरांहून अधिक सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना केली असून बहुतांशी मंडळांनी सांगली व कोल्हापूर येथे झालेल्या पूरस्थितीचा देखावा सादर केला आहे. सिडको भागात यंदाच्या वर्षी सिडकोचा महाराजा सिडको वसाहत मित्रमंडळाचे अध्यक्ष अक्षय खांडरे यांनी १८ फुटी भव्य श्री गणेशाचा राजवाडा हा देखावा सादर केला आहे.
इच्छामणी कॉलनी, खोडे मळा येथील भैरवनाथ सांस्कृतिक कला व क्रीडामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी नऊ फुटी भव्य गणेशाची आकर्षक मूर्ती हा देखावा, तर वंदे मातरम मित्रमंडळाचे संस्थापक राहुल गणोरे यांनी श्री क्षेत्र शिर्डी साईदरबाराचा देखावा सादर केला आहे. खोडेमळा येथील भैरवनाथ कला, क्रीडा मंडळाचे संस्थापक विजय खोडे यांनी गणेशमूर्ती देखावा सादर केला आहे. तुळजा भवानी चौकातील सिद्धिविनायक मित्रमंडळाने संस्थापक विजय रणाते यांनी यंदाच्या वर्षी आकर्षक गणेशमूर्ती आकर्षण ठरत आहे. जुने सिडको येथील वंदे मातरम मित्र मंडळाच्या वतीने मंडळांचे सस्थापक राहुल गणोरे यांनी श्रीक्षेत्र बालाजीचा देखावा सादर केला आहे.
शनिवार आणि रविवारी देखावे पाहाण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. परिसरातील मंडळांनी देखाव्यांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचेदेखील आयोजन केल्यामुळे भाविकांकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळत आहे. भाविकांनी गर्दी वाढू लागल्याने परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
विद्युत रोषणाईने उजळला परिसर
खांडेमळा येथील श्री सिद्धिविनायक कॉलनी मित्रमंडळाचे अध्यक्ष गौरव वराडे यांच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य आकर्षक मूर्ती हा देखावा सादर केला आहे. स्वामी विवेकानंदनगर येथील पेलिकन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवि भालेराव यांच्या वतीने यंदाच्या वर्षी महेशमती मंदिराचा देखावा सादर केला आहे. परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे भालेराव याांनी सांगितले.