विनादरवाजांचे कोंडवाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:22 AM2017-09-23T00:22:27+5:302017-09-23T00:22:33+5:30

भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनावरांना पकडून कोंडण्यासाठी महापालिकेकडे दोनच कोंडवाडे आहेत. त्यातही, एकच कोंडवाडा कार्यरत आहे तर दुसरा मद्यपींसाठी अड्डा बनलेला आहे. वास्तविक शहरातील सहाही विभागांकरिता प्रत्येकी एक कोंडवाड्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्षच दिलेले नाही. मोकाट जनावरे पकडण्याचे अर्थकारणही संशयास्पद आहे.

 Kondwade of Devadarajas! | विनादरवाजांचे कोंडवाडे !

विनादरवाजांचे कोंडवाडे !

Next

स्टिंग आॅपरेशन
धनंजय वाखारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनावरांना पकडून कोंडण्यासाठी महापालिकेकडे दोनच कोंडवाडे आहेत. त्यातही, एकच कोंडवाडा कार्यरत आहे तर दुसरा मद्यपींसाठी अड्डा बनलेला आहे. वास्तविक शहरातील सहाही विभागांकरिता प्रत्येकी एक कोंडवाड्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्षच दिलेले नाही. मोकाट जनावरे पकडण्याचे अर्थकारणही संशयास्पद आहे. मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार महापालिका दरवर्षी ठेका देण्याची औपचारिकता पूर्ण करते, ठेकेदार जमेल तसे मोकाट जनावरे पकडतो, कोंडवाड्यात टाकतो, पकडलेल्या जनावरांना पशुपालक सोडवून नेतात, काही मालक दंडाची रक्कम भरतात तर काही ठेकेदाराला दमदाटी करत जनावर घेऊन जातात. पुन्हा दुसºया दिवशी तीच जनावरे रास्ता रोकोसाठी सज्ज. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. महापालिकेचे शहरात केवळ दोनच कोंडवाडे आहेत. एक कोंडवाडा पंचवटी विभागात महापालिकेच्या भांडाराच्या पाठीमागे आहे, तर दुसरा सातपूर विभागात अग्निशमन दलाच्या जवळ आहे. सातपूर विभागातील कोंडवाड्याचा वापरच होताना दिसून येत नाही. त्याठिकाणी जनावरांपेक्षा मोकाट मद्यपींचा अधिक वावर असतो. हा कोंडवाडा जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी एका संस्थेला दिल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याठिकाणी तशी काही व्यवस्था चालते, याचा मागमूसही दिसून आला नाही. सद्यस्थितीत पंचवटीतीलच कोंडवाड्याचा वापर होताना दिसून येतो. याठिकाणी, मोकाट जनावरांना पकडून आणण्यासाठी छोटा टेम्पो आहे. ठेकेदाराकडून प्रामुख्याने, सकाळी दोन तासांतच दोन-चार जनावरे पकडून आणण्याचे काम केले जाते. दिवसभर टेम्पो कोंडवाड्याजवळच पडून असतो. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ठेकेदाराकडून पकडून आणलेल्या जनावरांची संख्या होती ४७८. म्हणजेच दरमहा ४० जनावरे तर प्रतिदिन एक ते दोन जनावरांचा हिशेब होतो. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी भटकताना दिसत असताना कोंडवाड्यात दिवसाला दोन-तीन जनावरे दिसून येतात. त्यातच ठेकेदाराकडून पंचवटी परिसरातील जवळपासचीच जनावरे पकडून आणली जातात. सिडको, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील मोकाट जनावरे मोकाटच असतात. त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. कुणी तक्रार केली तरच जनावर उचलले जाते. त्यामुळे शहरात ठेकेदार एक पण मोकाट जनावरे हजार असल्याने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ठेका देण्याची आवश्यकता तर आहेच शिवाय, प्रत्येक विभागात एक कोंडवाडा उभारण्याची गरज आहे.  महापालिकेने नावापुरता ठेका दिला आहे. परंतु, त्याच्याकडून प्रभावी असे कामकाज होताना दिसून येत नाही. या ठेक्यामागे शहराची समस्या सोडविण्यापेक्षा अर्थकारणच अधिक  दडलेले दिसते. त्यामुळे या प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोशाळेतील जनावरांचा संशयास्पद व्यवहार?
महापालिकेकडून ठेकेदाराला निश्चित केलेल्या दरानुसार प्रति जनावर रक्कम मोजली जाते. ठेकेदाराने जनावर पकडून आणल्यानंतर जनावराच्या खाण्याचाही खर्च करायचा आहे. तो खाणावळ खर्चही महापालिकेकडून दिला जातो. जनावर पकडून आणल्यानंतर जास्तीत जास्त दहा दिवसांपर्यंत कोंडवाड्यात ठेवण्याची मुभा आहे. जनावराचा मालक न आल्यास सदर जनावर हे गोशाळेत सांभाळण्यासाठी जमा केले जाते. परंतु, जमा केलेल्या जनावराचे पुढे नेमके काय होते, याची तपासणी करणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामागेही मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. वास्तविक संबंधित गोशाळा चालविणाºया संस्थेने जनावरांची विक्री अथवा त्यांचा व्यवसाय करू नये, या अटीवर जनावरे सांभाळण्यासाठी दिली जातात. नेमके त्याचे पालन होते आहे काय? मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दरमहा आॅडिट होण्याची गरज आहे.
मोकाट जनावरे रस्त्यांवर का दिसतात?
मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेमार्फत ठेका दिला असतानाही दरदिवशी मोकाट जनावरे ठिकठिकाणी मोठ्या संख्येने ठिय्या मांडून बसलेली दिसून येतात. जनावरे रस्त्यांवर मोकळी सोडून देण्यामागेही काही व्यवहार दडला आहे काय, याचीही तपासणी होण्याची गरज निर्माण झालेली आहे. जनावरे मोकळी सोडून द्यायची, ठेकेदाराने ती पकडून नेऊन कोंडवाड्यात टाकायची, मालक आला नाही म्हणून ती गोशाळेत पाठवायची आणि गोशाळेतून ती परत रस्त्यांवर पाठवायची, असा काही व्यवहार तर होत नाही ना, याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. महापालिकेच्या महासभा व स्थायी समितीच्या सभांमध्ये मोकाट जनावरांच्या उच्छादाबद्दल सदस्य तक्रारी मांडताना दिसून येतात परंतु, रस्ता ते कोंडवाडा असा सारा प्रवास कशा प्रकारे चालतो, याचा कुणी गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसून आलेला नाही.

Web Title:  Kondwade of Devadarajas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.