कोराना संचारबंदीचा मनपाच्या पाणी पट्टी वसुलीलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 02:06 PM2020-04-02T14:06:37+5:302020-04-02T14:09:04+5:30
नाशिक: कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन केल्याने त्याचा महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. चालु आर्थिक वर्षातील ६४ कोटी व मागील थकबाकीपोटी ६५ कोटी असे एकूण १२९ कोटींच्या उद्दीष्टापैकी आर्थिक वर्षाअखेर जेमतेम ५४ कोटी ८० लाख कोटींची वसुली होऊ शकली आहे. यात मागील थकबाकीपोटी १८ कोटी १३ लाख तर चालु देयकांपोटी ३६ कोटी ४८ लाख रूपयांची वसुली झाली आहे.
नाशिक: कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन केल्याने त्याचा महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. चालु आर्थिक वर्षातील ६४ कोटी व मागील थकबाकीपोटी ६५ कोटी असे एकूण १२९ कोटींच्या उद्दीष्टापैकी आर्थिक वर्षाअखेर जेमतेम ५४ कोटी ८० लाख कोटींची वसुली होऊ शकली आहे. यात मागील थकबाकीपोटी १८ कोटी १३ लाख तर चालु देयकांपोटी ३६ कोटी ४८ लाख रूपयांची वसुली झाली आहे. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत तब्बल १३ कोटी ५५ लाख रूपयांची वाढ झाली आहे.
घरपट्टी वसुलीत गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ दिसत असली तरी पाणी पट्टीची अवस्था बिकटच आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता पाणीपट्टी वसुलीचे ६४ कोटी तर मागील वर्षांच्या थकबाकीपोटी ६५ कोटी रु पये वसुलीचे उद्दीष्ट पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले होते. मात्र, गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आल्याने पाणी पट्टी वसुलीवर परिणाम झाला. त्यामुळे पाणीपट्टीच्या देयकांचे वाटप करण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात करवसुली वाढविण्यासाठी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला आदेश दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी नळ जोडणी खंडीत करण्यात आली. त्यांनतर वसूलीला वेग आला खरा परंतु नंतर महापालिका आॅनलाईन पाणी पट्टी येस बॅँकेच्या खात्यात जमा करीत असल्याने अडचण झाली. त्यामुळे पाणी पुरवठा वसुलीत व्यत्यय आला. दरम्यान, कोरोनाचे संकट उदभवले. संचारबंदीमुळे बहुतांश नागरिकांनाही कर भरणा केंद्रांपर्यंत येता आले नाही. काही नगरीकांनी आॅनलाईन करभरणा केला असला तरी त्याची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर पाणीपट्टीचे उद्दीष्ट्य साध्य करण्यात प्रशासनाला अपयश आले.
गेल्या वर्षी पाणीपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला ४१ कोटी २४ लाख रूपये मिळाले होते. त्यात मागील थकबाकीपोटी १५ कोटी १० लाख रूपये वसुल झाले होते. तर चालु मागणीपोटी २५ कोटी १३ कोटी व १ कोटी ९ कोटी आगाऊ पाणीपट्टी पालिकेला मिळाले होते. यंदा मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीत १३ कोटी ५५ लाख रूपयांची वाढ झाली असून एकूण ५४ कोटी ८० लाख रूपये वसुल होऊ शकले आहेत. यात मागील थकबाकीपोटी १८कोटी १३ लाख तर चालु मागणीपोटी २६ कोटी ४८ लाख रूपयांच करवसुली झाली आहे. त्यात १८ कोटी १३ लाख रु पये आगाऊ भरणा झाला आहे.