कोष्टी समाजाच्या वतीने तहसीलसदारांना निवेदन

By admin | Published: September 6, 2014 10:16 PM2014-09-06T22:16:02+5:302014-09-06T22:16:02+5:30

कोष्टी समाजाच्या वतीने तहसीलसदारांना निवेदन

Koshti community on behalf of the Tehsildars | कोष्टी समाजाच्या वतीने तहसीलसदारांना निवेदन

कोष्टी समाजाच्या वतीने तहसीलसदारांना निवेदन

Next


निफाड : अनुसूचित जमातीत (एस.टी.) समावेश करावा या मागणीसाठी निफाड येथील कोष्टी समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. प्राचीन काळापासून कोष्टी समाज त्यातील पोटजातीसह ‘आदीम जमात’ म्हणून जगत आला आहे. आदीम काळापासून विणण्याचा व्यवसाय करीत आहे. या समाजाला अनुसूचित जमात या सूचित समाविष्ट करण्यासाठी केंद्रसरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदन सादर करण्यासाठी अ‍ॅड. दिलीप वाघवकर, गुलाब टकले, सुधाकर मरडे, भगवान बाप्ते, किशोर मरडे, अ‍ॅड. भुजबळ, मंदाकिनी टकले, मालती वाघावकर, सुनीता मरडे, रवींद्र कुमठेकर, शुभंम नवले, हेमंत टकले आदि उपस्थित होते.

Web Title: Koshti community on behalf of the Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.