रोहित्र जळाल्याने कोटमवाडी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:30 PM2020-08-06T22:30:17+5:302020-08-07T00:32:36+5:30

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Kotamwadi in darkness due to burning of Rohitra | रोहित्र जळाल्याने कोटमवाडी अंधारात

रोहित्र जळाल्याने कोटमवाडी अंधारात

Next
ठळक मुद्देरोहित्रावर अतिरिक्त ताण वाढल्याने रोहित्र जळाले.

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनेक अडचणी व संकटाचा सामना केल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर महावितरण विभागाने या वाड्यांसाठी नवीन विद्युत रोहित्र बसविला. परंतु, विद्युत रोहित्रावर अतिरिक्त ताण वाढल्याने रोहित्र जळाले. त्यामुळे कोटमवाडी व निर्गुडपाडा या गावांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे.
विजेअभावी विजेवर चालणारी उपकरणे बंद असल्याने अनेक कामांवर परिणाम झाला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून थ्री फेज वीजवाहिनी मिळत नसल्याने पिठाची गिरणी बंद असून, येथील आदिवासी महिलांना दहा ते बारा किलोमीटर दळणासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच रात्रीच्यावेळी साप, विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका संभवत आहे.

Web Title: Kotamwadi in darkness due to burning of Rohitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.