काठी-कावडी उत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:12 AM2018-04-11T00:12:50+5:302018-04-11T00:12:50+5:30

लोहोणेर : येथे चैत्र महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून भगवान महादेवाच्या महिनाभर चालणाऱ्या काठी-कावडी उत्सवाची मोठ्या थाटात सांगता झाली.

Kothi-Kavadi Festival | काठी-कावडी उत्सवाची सांगता

काठी-कावडी उत्सवाची सांगता

Next
ठळक मुद्देनवीन लाल वस्त्राने या कावड्या पूर्ण झाकलेल्या असतात लोहोणेरवासीय परंपरेनुसार दरवर्षी काठी-कावडी उत्सव साजरा करतात

लोहोणेर : येथे चैत्र महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून भगवान महादेवाच्या महिनाभर चालणाऱ्या काठी-कावडी उत्सवाची मोठ्या थाटात सांगता झाली. दोन महादेवाच्या कावडीवर नंदीचे चित्र कोरलेले असते व त्या दोन कावडींपैकी एक कावडी ही महादेवाची, तर दुसरी कावडी पार्वतीचे प्रतीक असते. तीन दिवे (रोशन) असतात. महादेवाची काठी व डालकी असते. नवीन लाल वस्त्राने या कावड्या पूर्ण झाकलेल्या असतात व चैत्र महिन्यात दर सोमवारी सायंकाळी ८ वाजता डफ वाजवून मिरवणुकीस सुरुवात होते. ही काठी-कावडी गावातून मिरवली जाते. आजपर्यंत कुठलाही खंड न पडता लोहोणेरवासीय परंपरेनुसार दरवर्षी काठी-कावडी उत्सव साजरा करतात. चैत्र महिन्यात सोमवारी गावातून रात्री आठ वाजता मिरवणूक काढून येथील माळी समाज तसेच कुंभार समाजाचे तसेच तेली समाजाचे काही भाविक मोठ्या उत्साहात व ताला-सुरात यावेळी गाणे म्हणतात, त्यांच्या मागून उपस्थित असलेले ग्रामस्थ गाणे म्हणतात. लोहोणेर परिसरातील काही कुटुंबे व्यवसाय व नोकरीसाठी बाहेर आहेत. तेही उत्सवानिमित्ताने गावात हजेरी लावतात. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Kothi-Kavadi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा