नवरात्रोत्सवा निमित्त कोटमगावी रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:01 IST2020-10-25T23:41:05+5:302020-10-26T01:01:04+5:30
येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले.

नवरात्रोत्सवा निमित्त कोटमगावी रक्तदान शिबीर
येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले.
शिबीराचे उदघाटन जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शरद लहरे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जगदंबा देवस्थान ट्रस्टचे भाऊसाहेब आदमाने, ग्रामसेवक गणेश रोकडे, नवनाथ कोटमे, महेश कोटमे, सुनील कोटमे, प्रवीण लहरे उपस्थित होते. अर्पण रक्तपेढीने या शिबीरात २३ रक्तपिशव्यांचे संकलन केले. कार्यक्रमास रुपेश पुणेकर, रावसाहेब आदमने, भाऊसाहेब माळी, वैभव ठोंबरे, शंकर सोमवंशी, मनोज कोटमे, प्रशांत लहरे, नानासाहेब लहरे, विनायक लहरे, गोरख कोटमे, विकास लहरे, जगदीश घोडेराव, युवराज कदम आदी उपस्थित होते.