सातबारा उताऱ्यासाठी कोतवालला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:34 AM2019-07-28T00:34:28+5:302019-07-28T00:34:58+5:30
सटाणा : सातबारा उतार्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने एकाने कोतवालला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील करंजाड येथे शनिवारी (दि. २७) दुपारी घडला.
सटाणा : सातबारा उतार्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने एकाने कोतवालला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील करंजाड येथे शनिवारी (दि. २७) दुपारी घडला.
करंजाड येथील तलाठी कार्यालयात सकाळ पासूनच सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे कार्यालयात गोंधळ उडू नये म्हणून तलाठी भाऊसाहेब देवकाते, कोतवाल कैलास पोपट अहिरे यांनी रांगेत उभे राहून सातबारा वितरीत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सातबारा वितरण सुरु असतांना दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक योगेश उर्फ कपिल काळू देवरे याने अचानक रांगेत उभे न राहता आईच्या नावाच्या सातबारा उतार्याची मागणी केली. परंतु इतर शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून त्याला रांगेत उभे राहण्याची विनंती केल्याने त्याने गोंधळ घालून अर्वाच्च शिवीगाळ करून मला तू उतारा देशील असे म्हटले, अन्य शेतकरी रांगेत उभे असल्यामुळे त्याला स्पष्ट नकार दिल्याने कोतवाल कैलास अिहरे याला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली.
यावेळी तलाठी देवकाते यांनी भांडण सोडवून कोतवालची सुटका केली. दरम्यान कोतवाल कैलास अहिरे याने मारहाण व सरकारी कामात अडथला आणला म्हणून पोलिसात तक्र ार केली. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात योगेश उर्फ कपिल देवरे यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.