कुरु ंगवाडी गावावर शोककळा
By admin | Published: February 19, 2016 11:01 PM2016-02-19T23:01:16+5:302016-02-19T23:01:56+5:30
कुरु ंगवाडी गावावर शोककळा
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कुरुंंगवाडी गावातील चार आदिवासी मजुरांचा मुंबई येथील विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान लोकलखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुरुंगवाडी गावावर शोककळा पसरली आहे़
कुरुंगवाडीतील हे मजूर मुंबईला खासगी ठेकेदारामार्फत रेल्वे रूळ उचलणे, रु ळाखाली खडी भरणे आदि काम करत असत. नेहमीप्रमाणे रात्री १ वाजेनंतर लोकल सेवा बंद झाल्यानंतर छत्रपती शिवाजी स्थानकाच्या परिसरात रात्रभर काम करून पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कुर्ला परिसरात रेल्वेलाइनवर रु ळाचे काम करीत असतानाच पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक मागून आलेल्या लोकलने दिलेल्या धडकेत हे चौघे मजूर जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला.
रेल्वे अपघातात श्रावण बाहू वारे ( १८), काशीनाथ बागे ( १९ ), गोकुळ पोखळे (१८), नाना चंदर सावंत ( २७) यांचा जागीच मृत्यू झाला. यातील नाना चंदर सावंत याला एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरूंगवाडीतील गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)