वडांगळी ग्रामपंचायतीकडून लोकसहभागातून कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:54+5:302021-04-30T04:17:54+5:30
सिन्नर : वडांगळी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य ...
सिन्नर : वडांगळी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे व तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव यांनी भेट देऊन पाहणी केली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर जबाबदारी घेऊन कामकाज अधिक वाढविण्याची गरज आहे. वडांगळी येथील ४० बाधित रुग्णसंख्येमागे एकास दहा याप्रमाणे ४०० पर्यंत हायरिस्क व लोरिस्क चाचण्या होणे आवश्यक असल्याने चाचण्यांवर अधिक भर देण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या. त्याचबरोबर नव्याने सूक्ष्म आरोग्य सर्वेक्षण शिक्षक व अंगणवाडीसेविका यांना सोबत घेऊन आशासेविकांनी लवकर पूर्ण करावे. रोज एका टीमने किमान ५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक असून, लक्षणे असणाऱ्या नागरिकांची तत्काळ कोरोना चाचणी करण्याबाबतदेखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर वडांगळी गावात सुरू असलेल्या निर्बंधांच्या नियमांचे गावात सुरू असलेले पालन, कोरोना प्रतिबंधित क्षेत्र व कोविड केअर सेंटर यांना भेट देत समाधान व्यक्त केले. कोविड सेंटरसाठी विनाशुल्क सामाजिक जाणिवेतून डॉ. ज्ञानेश्वर म्हाळणकर घेत असलेले प्राणायाम व योगासनाचे धडे, आशासेविकांकडून होत असलेली ऑक्सिजन तपासणी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत होणारी निर्जंतुकीकरण फवारणी तसेच डॉ. सचिन निकम व डॉ. माणिक अडसरे यांच्याकडून सकाळ संध्याकाळ होत असलेली रुग्ण चिकित्सा या सर्व बाबींचे विशेष कौतुक केले. यावेळी शिंदे यांच्यासमवेत सरपंच योगेश घोटेकर, विक्रम खुळे, विलास खुळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, आरोग्य सेवक अशोक सानप, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोट.....
वडांगळी ग्रामपंचायतने लोकसहभागातून तसेच खासगी डॉक्टर्सच्या मदतीने उभे केलेले कोविड केअर सेंटर हा पथदर्शी प्रकल्प असून, इतर गावांनी याबाबत आदर्श घेऊन कोरोनावर मात करावी. आदर्शवत काम वडांगळी येथे कोरोनाबाबत सुरू आहे.
-रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
फोटो - २९ वडांगळी कोरोना
वडांगळी येथील कोविड केअर सेंटरला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, डॉ. मोहन बच्छाव, सरपंच योगेश घोटेकर, विक्रम खुळे, विलास खुळे, पांडुरंग सोळंके आदी.
===Photopath===
290421\29nsk_13_29042021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ वडांगळी कोरोना वडांगळी येथील कोविड केअर सेंटरला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, डॉ मोहन बच्छाव, सरपंच योगेश घोटेकर, विक्रम खुळे, विलास खुळे, पांडुरंग सोळंके आदि.