पुरणगाव येथे कोविड लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:03 PM2021-05-30T16:03:05+5:302021-05-30T16:03:58+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुका आरोग्य विभाग अंतर्गत मुखेड आरोग्य केंद्रामार्फत, ग्रामपंचायत कार्यालय पुरणगाव यांच्या पुढाकाराने पुरणगाव येथे कोविड -१९ लसीकरण शिबिर घेण्यात आले.
जळगाव नेऊर : येवला तालुका आरोग्य विभाग अंतर्गत मुखेड आरोग्य केंद्रामार्फत, ग्रामपंचायत कार्यालय पुरणगाव यांच्या पुढाकाराने पुरणगाव येथे कोविड -१९ लसीकरण शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी १६० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. शिबिरासाठी मुखेड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. तुषार बाविस्कर, डॉ. जी. एन. मढवई, ज्योती वाघ, व्ही. सी. पैठणकर, नितीन व्यवहारे, ललिता चव्हाण, वर्षा सुताने, रीना ठोंबरे, सविता माळी आदी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कोविड लसीकरणाची सुरुवात पुरणगावच्या सरपंच मंदाकिनी ठोंबरे यांच्या लसीकरणाने झाली. याप्रसंगी मुखेड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मढवई यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच रामनाथ ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, श्रावण खंडेराव ठोंबरे, ग्रामसेवक व्ही .आर. कवडे, ग्रामपंचायत कर्मचारी रहीम शेख ,संतोष ठोंबरे आदी उपस्थित होते.