निफाड उपजिल्हा रुग्णालयात दिली १०० जणांना कोविड प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 09:00 PM2021-01-19T21:00:46+5:302021-01-20T01:27:38+5:30
निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.१९) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात निफाड केंद्रात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.१९) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात निफाड केंद्रात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती उपजिल्हा रुग्णालयात केंद्राला १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मंगळवारी दिवसभरात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली. यात ३२ पुरुष तर ६८ महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
लस दिल्यानंतर कोणत्याही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास झाला नाही. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. चेतन काळे, निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहण मोरे, डॉ. योगिता गायकवाड, डॉ. योगेश शिंदे, डॉ. सवई, डॉ. समाधान पाटील आदीचे वैद्यकीय पथक उपस्थित होते.