प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:22 PM2020-07-22T15:22:54+5:302020-07-22T17:30:49+5:30

साकोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्ताने नांदगाव शाखेच्या वतीने कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला.

Kovid Warriors felicitated on the anniversary of Primary Teachers Committee | प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सत्कार

प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सत्कार

googlenewsNext

साकोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्ताने नांदगाव शाखेच्या वतीने कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला. प्रथम संस्थापक शिंपी गुरु जींच्या प्रतिमेचे पूजन करून नांदगाव शहराचे संपुर्ण सर्वेक्षण करणारे साकोरा येथील कोरोना योद्धे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती आदि २५ कोविड योद्धा महिलांना टिफीन बॉक्स , सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सुरक्षित अंतर ठेवून, मास्क व सॅनेटाईझरचा उपयोग करून सदर कार्यक्र माचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाकाळात एकही दिवस सुट्टि न घेता स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनासंदर्भातील परिपूर्ण माहिती वृत्तपत्राद्वारे साकोरा परिसरातील घरोघरी वृत्तपत्र वितरक बाबासाहेब बोरसे आणि भगवान हिरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी धोंडीराम पठाडे, हेमंत पवार, सुरेश मोरे, आर. आर. बोरसे, रावसाहेब शेवाळे, शेवरे, हंसराज बोरसे, अवि खोंडे, बाबासाहेब नाईकवाडे, अशोक देवरे, गणेश साळी , राऊत , बोढरे मॅडम, सरचिटणीस अनिल बोरसे अध्यक्ष रविंद्र बोरसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊसाहेब मवाळ यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष शरद निकम यांनी मानले.

Web Title: Kovid Warriors felicitated on the anniversary of Primary Teachers Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक