त्र्यंबकमध्ये कोव्हीडचा कहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:38 PM2021-03-31T22:38:34+5:302021-04-01T00:54:20+5:30

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.

Kovid's havoc in Trimbak! | त्र्यंबकमध्ये कोव्हीडचा कहर !

त्र्यंबकमध्ये कोव्हीडचा कहर !

Next
ठळक मुद्दे१६५ पॉझिटिव्ह : आजपासून ह्यमोतीवालाह्ण ची टीम त्र्यंबकेश्वरमध्ये

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.
जिल्हा परिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण ३९२ होते आता ४२७ आहे. तर नगरपरिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आता ३६२ आहेत.

ग्रामीण भागातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी त्र्यंबकेश्वरच्या घराघरात सर्वेक्षण मोहीम सुरु करुन पॉझिटिव्ह रुग्ण अंजनेरी शिवारात ब्रम्हाव्हॅली नजीक निसर्गाच्या सान्निध्यातील ट्रेकींग विश्राम गृह येथे दाखल करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तेथे कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. इतक्या दिवस जागाच मिळत नव्हती आता येथे दोन मोठे हॉल असुन बुधवारी तेथे ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवार पासुन गावातर्फे जनता कर्फ्यु आठ दिवस पाळण्यात येत आहे. याशिवाय दर शनीवारी रविवारी जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच संचारबंदी लागु केलेली आहे. त्यात त्र्यंबकेश्वर मंदीरही बंद ठेवले आहे.

सध्या तालुक्यातील रुग्ण संदीप फाउंडेशन येथे डीसीएचसी उपचार केले जातात. शहरातील सर्वसाधारण रुग्ण कोव्हीड केअर सेंटर अंजनेरी येथे ठेवले जात आहे. आता त्र्यंबकमधील रुग्ण संख्या १० ते २० संख्येने वाढत असुन ही बाब चिंताजनक आहे.
दरम्यान पालिकेने आता शहराच्या सर्वच भागात सॅनिटायझरची फवारणी सुरु केली आहे. पण कोव्हीडची शृंखला तोडणे गरजेचे आहे. कारण रुग्ण वाढले की त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात येतात. त्र्यंबकेश्वर, हरसुल, अंजनेरी येथील ॲन्टीजेन रॅपिडचे स्वॅब थेट ५०/६० होतात. त्यांच्यातून निम्याहून अधिक पॉझिटिव्ह असतात. ही शृंखला तोडणे गरजेचे आहे.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. भागवत लोंढे, अंजनेरी येथील प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, स्व शहरी ग्रामीण आरोग्य कर्मचारी आदी कोरोना कोव्हीड योध्दे काम करत आहे.

शहरात पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे कोरोनाची लक्षणे संशय आल्यास गावातील सधन परिस्थितीतील रुग्ण थेट नाशिक येथील मोठी हॉस्पिटल गाठतात. तेथे स्वॅब देण्याऐवजी लगेच एमआरआय काढला जातो. आणि लगेच आयसीयुमध्ये दाखल करुन उपचार सुरु करतात. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह असे कर्मचा-यांना माहित पडत नाही.

Web Title: Kovid's havoc in Trimbak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.