‘क्रांतिसूर्य’ने उघडला कालिदासचा पडदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:25 AM2021-01-04T01:25:16+5:302021-01-04T01:25:36+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन बाईक रॅली काढण्यात आली.

'Krantisurya' opens Kalidasa's curtain! | ‘क्रांतिसूर्य’ने उघडला कालिदासचा पडदा !

‘क्रांतिसूर्य’ने उघडला कालिदासचा पडदा !

Next
ठळक मुद्देनाट्यप्रयोग : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन बाईक रॅली काढण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेली समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना किती अडचणींवर कशी मात करावी लागली, या विषयावरील नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात आले. 
या नाट्य सादरीकरणापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. त्यात नाशिकच्या विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदवला.  यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, समीना मेमन, आशा कटारे, वैशाली नाईकवाडे,  अनघा धोडपकर, विजय राऊत, बाजीराव तिडके, सी. एम. सैनी, नीलेश खैरे, कल्पना कुटे, अनंता सूर्यवंशी, राजेश शर्मा, संतोष कमोद, शशी हिरवे, उत्तम आंबे, संजय गिते, चंद्रकांत बागूल आणि सूत्रधार योगेश कमोद आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार फरांदे वडाॅ. बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. 
राजेश शर्मा लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात नाशिकच्या ४० कलावंतांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा आलेख मांडला. 

Web Title: 'Krantisurya' opens Kalidasa's curtain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.