स्वामी समर्थ केंद्रातर्फेकृषी महोत्सवविविध उपक्रम : सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:21 AM2018-04-09T00:21:50+5:302018-04-09T00:21:50+5:30
दिंडोरी : येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) तर्फेदि. २५ ते २९ एप्रिलदरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर सातव्या जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिंडोरी : येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) तर्फेदि. २५ ते २९ एप्रिलदरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर सातव्या जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत संस्कृती साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित वधूवर मेळाव्यात जमलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा मोफत सामुदायिक विवाहसोहळा करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाºया या कृषी महोत्सवात राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, भारत व कृषी संस्कृती दर्शन, पशुधन गोवंश प्रदर्शन, बी-बियाणे महोत्सव, दुर्मीळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दि. २५ रोजी दुपारी २ ते ५ ‘नैसर्गिक शेतीतून शाश्वत समृद्धी’, दि. २६ रोजी दु. २ ते ५ ‘देशी बियाणे संवर्धन काळाची गरज’, दि. २७ रोजी सकाळी १० ते १ ‘पर्यावरण प्रकृती व दुर्ग संवर्धन’, दुपारी २ ते ५ ‘दुग्ध व्यवसायातील सोनेरी संधी’, दि. २८ रोजी दुपारी २ ते ५ ‘कृषी क्षेत्रातील प्रक्रि या उद्योग व व्यवसायातील संधी’ या विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद, दि. २६ रोजी सकाळी १० ते १ शेतकरी वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. दि. २९ रोजी सरपंच मांदियाळी कार्यक्रमात राज्यभरातील विविध सरपंचांच्या उपस्थितीत कार्यक्रम होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे. दररोज सायंकाळी ५ ते ७ कृषी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात शेतकरी, नागरिक, सेवेकरी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे करण्यात आले आहे.