क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:38 AM2018-05-31T00:38:26+5:302018-05-31T00:38:26+5:30
काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते.
सिडको : काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळाच्या वतीने समाजाच्या लक्ष्मीधवल समाजमंदिरामध्ये आयोजित वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी कड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर कापडणे, शोभा कापडणे, लतिका सावळे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कड पुढे म्हणाले, वरवरच्या प्रतिष्ठेपायी वधूवर पालकांकडून विवाह सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या प्रकाराला आळा घालून सामुदायिक विवाह सोहळे करणे ही नितांत गरज असल्याचेही कड यांनी स्पष्ट केले. कार्यक्र मास खासदार हेमंत गोडसे तसेच समाजाचे जे. के. चव्हाण, सुभाष बेंडाळे, डॉ. बिरारी, रवींद्र जाधव, सुधाकर सोनवणे, अजय खैरनार, दिगंबर गवांदे, चंद्रकांत देवघरे, बी. एम. बागुल, विजय भामरे, सुनील गांगुर्डे, पुंडलिक खैरनार, भागवत बोरसे, शांताराम बाविस्कर, अरुण महाले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शेखर निकुंभ यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास राज्यातून सुमारे १२०० हून वर व वधू सहभागी झाले होते. मंडळाचे बापू खैरनार यांनी स्वागत केले, तर शशिकांत मांडगे यांनी आभार मानले.