केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल गार्ड्स ड्रील स्पर्धा : महाराष्टÑ बटालियनमधील मुलींची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:01 AM2018-01-01T01:01:36+5:302018-01-01T01:02:12+5:30
नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसीच्या गार्ड्स पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाºया वन महाराष्ट्र बटालियनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्ड्स ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गार्ड्स आॅफ आॅनर पथकात एक संत्री (पहारेकरी), एक गार्ड कमांडर व सहा छात्र असे एकूण आठ शस्त्रधारी छात्रांचा समावेश असतो. या गार्ड्स ड्रीलची स्पर्धा मुंबई ‘बी’ ग्रुप अंतर्गत येणाºया नाशिक विभागाची स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयात व मुंबई विभागाची स्पर्धा मुंबई येथे एकाच वेळी पार पडली. या माध्यमातून नाशिक विभागात ७ महाराष्ट्र बटालियनकडे डेमो रायफल उपलब्ध असल्या तरी बटालियनकडे संचलनाच्या सरावासाठी मात्र रायफल उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एनसीसी अधिकारी शैला मेंगाणे, लेफ्टनंट जयश्री कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील विजेती पथके
स्पर्धेत मुंबई ‘बी’ ग्रुपमधून केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी मुलींच्या पथकाने प्रथम क्र मांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत व मुंबई येथील महाराष्ट्र महाविद्यालयाने तृतीय क्र मांक पटकावला. या स्पर्धेसाठी १ महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, मुंबई येथील सुभेदार सी. विश्वनाथ, सुभेदार मदन पाल, सी. एच. एम. देवरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी आवश्यक असणाºया रायफल ७ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथकाने पुरविल्या होत्या.