नॅक मानांकनात केटीएचएम राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:22 AM2017-10-31T00:22:05+5:302017-10-31T00:22:05+5:30
राज्यभरातील विविध महाविद्यालयांचे नॅकच्या माध्यमातून परीक्षण झाल्यानंतर जाहीर झालेल्या नॅक मानांकनामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने ३.७९ गुण प्राप्त करीत बाजी मारली आहे. नॅकने केलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयाने सर्वाधिक गुणांक प्राप्त करून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले असून, नॅकने महाविद्यालयाला ए प्लस प्लस रँक दिली आहे.
नाशिक : राज्यभरातील विविध महाविद्यालयांचे नॅकच्या माध्यमातून परीक्षण झाल्यानंतर जाहीर झालेल्या नॅक मानांकनामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने ३.७९ गुण प्राप्त करीत बाजी मारली आहे. नॅकने केलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयाने सर्वाधिक गुणांक प्राप्त करून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले असून, नॅकने महाविद्यालयाला ए प्लस प्लस रँक दिली आहे.
नॅकच्या सात कसोट्यांच्या आधारे नॅक संस्थेने दि. २२ व २३ सप्टेंबरला सेल्फ स्टडी रिपोर्टच्या आधारे त्रिस्तरीय समितीद्वारे परीक्षण करून मूल्यांकन केले होते. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समन्वयक डॉ. एम. बी. मत्सागर, उपप्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर आदींनी भूमिका स्पष्ट केली.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक, पालक यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालास महाराष्ट्रात प्रथम येण्याचा हा बहुमान मिळाला याचा आनंद होत आहे. महाविद्यालयाचा लौकिक दिवसेंदिवस वाढविण्यासाठी सर्वजण यापुढेही जोमाने प्रयत्न करणार आहे.
- डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय