तीन एकर डाळिंबबागेवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:34 PM2019-12-28T13:34:39+5:302019-12-28T13:34:57+5:30

ब्राह्मणगाव : मर, तेल्या रोगाचा फटका ब्राह्मणगाव : तीन एकर क्षेत्रात डाळिंब बागेवर तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बागेचे एकूण बाराशे झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली आहे.

 Ku-bone on three acres of pomegranate | तीन एकर डाळिंबबागेवर कु-हाड

तीन एकर डाळिंबबागेवर कु-हाड

Next

ब्राह्मणगाव : तीन एकर क्षेत्रात डाळिंब बागेवर तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बागेचे एकूण बाराशे झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली आहे. काही ठिकाणी बागेवर कुºहाड चालविली. येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशिनाथ शिरोडे यांनी शेतात लागवड केलेल्या सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे डाळिंब बागाचा आलेला पूर्ण बहार रासायनिक खते,कीटकनाशक औषध फवारणी करून देखील फळबाग हाताशी न आल्याने तीन एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उपटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निसर्गाचा लहरीपणा, सततच्या रोगांच्या फळ बागेवर होणारा खर्च, विजेचा लपंडाव, वाढती मजुरी, फळ पिकांचा विमा काढूनही विमा कंपनी कधून कुठलीच दखल न घेणे, विक्र ी करून खर्च तर दूर तीन एकर क्षेत्रातील डाळिंब बागाला लागणारा लाखो रु पये केलेला खर्च पण निघणार नसल्याने या सर्व जाचाला कंटाळून डाळिंब शिरोडे यांनी डाळिंबबाग उपटून टाकली आहे.  हात उसनवार, तसेच बँकेकडून कर्ज घेऊन डाळिंब पिकाच्या क्षेत्रात लाखो रूपये खर्च करून तयार झालेले डाळिंब पीक त्यावर तेल्या व मररोगाने डाळिंब पिकाला ग्रासल्यामुळे हाताशी आलेले पीक सोडून देण्यासह पूर्ण डाळिंब बाग उपटण्याची वेळ आल्याने लाखो रु पयांचा केलेला खर्च वाया गेला आहे. शासनाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी तसेच निसर्गाचा सतत फटका फळ बागांना मिळत असून शेतकर्यांनी फळ पीक विमा भरला असून ही विमा कंपनी भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अशी तक्र ार डाळिंब उत्पादक अशोक शिरोडे यांनी केली आहे.

Web Title:  Ku-bone on three acres of pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक