कु-हेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला एक हात मदतीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:45 PM2020-04-06T16:45:24+5:302020-04-06T16:46:11+5:30

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत संपूर्ण गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ मुलांना व साकूर फाटा येथील मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले.

 Ku-hegaon offers a helping hand for orphans! | कु-हेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला एक हात मदतीचा !

कु-हेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला एक हात मदतीचा !

Next
ठळक मुद्दे आदर्श उपक्रम : गावातून संकलित केलेले धान्य वाटप

नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत संपूर्ण गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ मुलांना व साकूर फाटा येथील मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक गरीब, अनाथ मुलांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्यासाठी एक हात मदतीचा पुढे केला. संपूर्ण गावातून १०० ते १५० किलो तांदूळ जमा करून सदर धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ व गरीब मुलांना वाटप करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातील काही धान्य इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथे असलेल्या मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप केले आहे. कु-हेगाव ग्रामस्थांनी सदर धान्य वाटप करत असतांना सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत अनाथ आश्रमातील मुलांना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, मास्क लावून विशेष काळजी घ्यावी तसेच उघडे अन्न खाऊ नये याविषयी जनजागृती केली.
याप्रसंगी शिवसेनेचे शाखाप्रमुख अंबादास धोंगडे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर धोंगडे, भाऊसाहेब तांबे, रामदास गायकवाड, शिवाजी धोगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Ku-hegaon offers a helping hand for orphans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.