सीए परीक्षेत कु शल पाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:04 AM2020-01-17T02:04:51+5:302020-01-17T02:05:12+5:30
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
न्शिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे. कुशल लोढा याने यापूर्वी सीपीटी परीक्षेत देशभरात सहावी वी रँक तर आयपीसीसी परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर पाचवी वी रँक प्राप्त केली होती.
सनदी लेखापाल (सीए) विद्याशाखेतील नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत नाशिकच्या कु शल लोढा याने ५६६ गुणांसह शहरात प्रथम, तर देशात पाचवी क्रमवारी पटकावली आहे.
कुशलचे वडील संतोष लोढा विकासक असून, आई भारती लोढा गृहिणी आहे. आई आणि वडिलांचे आपल्या यशात अनन्यसाधारण महत्त्व असल्याची प्रतिक्रिया कुशलने व्यक्त केली आहे. त्याच्या पाठोपाठ हर्षाली सोनी ४६१, सोनाली हरजानी ४२१, अंकिता कोलते ४१९ व रितेश सुतार याने ४०७ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत वैशाली केला हिने ४०२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले असून यात भाग्यश्री भंडारी, दीपक कड, काजल चांडक, सागर ढगे, प्रतीक जलोरी, प्रसाद जामदार यांचाही समावेश आहे. आयसीएआय सीए परीक्षेचा फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाचा निकाल येत्या ३ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होणार आहे. सीए फायनल (नवीन अभ्यासक्रम) परीक्षा नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत देशभरातून ५ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जुन्या अभ्याक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत देशभरातून ९ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.