कुळवंडी बीटाने पटकावला चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 06:20 PM2020-01-07T18:20:24+5:302020-01-07T18:20:45+5:30
जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जि.प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात झाल्या. कुळवंडी बीट सलग तिसऱ्यांदा सभापती चषकाचे मानकरी ठरले.
पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जि.प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात झाल्या. कुळवंडी बीट सलग तिसऱ्यांदा सभापती चषकाचे मानकरी ठरले.
जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी जि.प. अध्यक्ष चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते करण्यात आले. पेठ तालुक्यात सहा बीट असून, प्रत्येक बीटातून प्रथम आलेल्या लहान व मोठ्या गटात चित्रकला, वक्तृत्व, धावणे, वैयक्तिक गीत, समूहगीत, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, कबड्डी, खोखो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जि.प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, कुमार मोंढे, भागवत पाटील, श्यामराव गावित, मोहन कामडी, अंबादास चौरे, पुंडलिक महाले, मनोहर चौधरी, गिरीश गावित, जाकीर मनियार, नंदू गवळी, सुरेश पवार, पद्माकर कामडी, दामू राऊत, राधा राऊत, शीतल रहाणे, अरुणा वार्डे, सचिन गाडगीळ, कैलास चौधरी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, शालेय पोषण आहार अधीक्षक विलास साळी, अनिल भडांगे, विषय प्रमुख प्रशांत जाधव, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, सुनीता जाधव, भारती कळंबे, धनश्री कुवर, मंगला गवळी, केंद्रप्रमूख मोतीराम सहारे, शिक्षक संघटनेचे मनोहर टोपले, रामदास शिंदे, राजेंद्र भोये, अनिल सांगळे, व्यंकट कदम यांच्यासह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय शिक्षक,
विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन, तर वसंत खैरनार यांनी आभार मानले.
सभापती चषक कुळवंडीला
सर्वाधिक पारितोषिक प्राप्त बीटाला तालुकास्तरीय सर्वसाधारण विजेते घोषीत करून सभापती चषक प्रदान करण्याची परंपरा पेठ तालुक्याने गत सात वर्षांपासून राबविली असून, ग्रामीण भागातील मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा पेठ हा जिल्ह्यात एकमेव तालुका असून, पंचायत समिती सेसमधून विजयी स्पर्धकांना हा चषक समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो.