सुरगाण्यात प्रकल्प अधिकाऱ्यास कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:00 PM2018-09-20T15:00:30+5:302018-09-20T15:00:53+5:30
सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यास होणा-या दिरंगाईमुळे संतापलेल्या पालकांनी शासकीय वसतीगृहात प्रकल्प अधिका-यांना कोंडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अर्धा तासाने त्यांची सुटका करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जातो. सप्टेंबर महिना उजाडला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील चारशे एक्याऐंशी मुलामुलींचे अर्ज प्रवेशाकरीता मागविण्यात आले होते. मात्र कळवण प्रकल्पाकडुन अद्यापही प्रवेश प्रक्रि या राबविण्यात आलेली नाही. अर्जाची छाननी करून तालुक्यातील चाळीस मुलींना व तीस मुलांना असे सत्तर मुलांची निवड पालकांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रि या राबविण्याकरीता कळवणच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. पैठणकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. महाजन यांनी शासकीय वसतिगृहात निवड प्रक्रि या राबविण्यास सुरवात केली. यावेळी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील पालक मुलांना घेऊन उपस्थित होते. निवड करीता पालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. चारशे एक्याऐंशी पैकी फक्त सत्तर मुलांनाच प्रवेश मिळणार असल्याने बाकीचे मुलांना प्रवेशा पासुन वंचित रहावे लागणार होते. त्यांनी अद्यापही कुठेही प्रवेश न घेतल्याने पालक संतप्त झाले. पालकांनी वसतिगृहात मुलाखती सुरू असलेल्या खोलीस कुलूप लावून प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनाच कार्यालयात कोंडून पालकांनी निवड प्रक्रि या बंद पाडली.