उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:09 PM2020-02-25T22:09:04+5:302020-02-26T00:16:14+5:30

सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

Kusum Koote is elected unopposed | उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध

मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम कुटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सरपंच संगीता बर्डे, मनीषा शेजवळ, एम. एम. मोरे, सविता बोडके, नामदेव कुटे, सचिन कुटे, केरू पिंगळे आदी.

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आपल्या सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंच मनीषा शेजवळ यांनी राजीनामा दिला
होता. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत उपसरपंचपदासाठी कुटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ग्रामसेवक एम. एम. मोरे यांनी कुटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सविता बोडके, नामदेव कुटे, सचिन कुटे, केरू पिंगळे, अनिल कुटे, बाळू पिंपळे, जयराम कुटे, संदीप कुटे, जयकांत कुटे, अण्णासाहेब कुटे, बाळकृष्ण कुटे, भगीरथ लांडगे, विठ्ठल लांडगे, संजय कुटे, रमेश कुटे, लक्ष्मण घाडगे, कचरू लांडगे, अनिल सानप, भाऊसाहेब बोडके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच कुसुम कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Kusum Koote is elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.