भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:47 AM2018-06-10T00:47:13+5:302018-06-10T00:47:13+5:30
येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.

सदरचा निपाह हा रोग केरळच्या ठरावीक जिल्ह्यात व विशिष्ट भाजीपाला व फळांवर आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या मातीत पिकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. असे निर्यातदार संघटनेच्या वतीने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर खासदार राजू शेट्टीव सदाभाऊ खोत यांनी थेट दिल्ली स्थित केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून त्यावर तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले.
निपाह हा व्हायरस वाटवाघळामुळे फळांवर आणि फळातून माणसात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजीपाला आणि फळांवर कुवेतने बंदी घातली आहे. याचा निर्यातीवर परिणाम होत असून शासनाने निपाहच्या प्रतिबंधाबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. शेतमालाची निर्यात बंद झाली तर शेती व शेतकरी अडचणीत येतील असेही बोलले जात आहे.केरळच्या ठरावीक जागी सिमित असणाºया निपाह विषाणूच्या भीतीने कुवेतने कांदा व भाजीपाल्याची कोंडी केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतप्रमाणे अन्य देशदेखील भारताच्या भाजीपाला, कांदा यावर बंदी घालू शकतील. केंद्र व राज्य शासनाने याबाबत गंभीर होऊन परिस्थिती हाताळावी.
- नंदकुमार आट्टल,
कांदा व्यापारी, येवला बंदीच्या संकटामुळे निर्यातदार धास्तावले असून, कांद्याचे भावदेखील एका कंटेनरला लाख रु पयांनी कमी झाले आहेत. कुवेतची निर्यात चालू असताना कांद्याला ८०० ते १००० रु पयापर्यंत भाव होते. हा माल आता अन्य देशात वळवावा लागत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
- संतोष आट्टल, राज्य निर्यातदार संघटना प्रतिनिधी, येवला