लासलगावी शेतमालाचे लिलाव सुरू

By admin | Published: November 18, 2016 11:06 PM2016-11-18T23:06:50+5:302016-11-18T23:08:41+5:30

शेतकऱ्यामंध्ये समाधान : पहिल्याच दिवशी लाल कांद्याला १६३१ रुपये भाव

Laalgawy farmer's auction begins | लासलगावी शेतमालाचे लिलाव सुरू

लासलगावी शेतमालाचे लिलाव सुरू

Next

लासलगाव : चलन तुटवड्यामुळे गेल्या सप्ताहभरापासून बंद असलेले येथील कांदा लिलावासह शेतमालाचे लिलाव शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. लिलावात लाल कांद्याला १६३१, तर उन्हाळ कांद्याला ९४५ रुपये सर्वाधिक भाव जाहीर झाला.
येथील उन्हाळ कांद्याची आवक १९० ट्रॅक्टर/पिकअप झाली. उन्हाळ कांद्याला किमान भाव ४०० रुपये, तर सर्वाधिक भाव ९४५ रुपये मिळाला. सर्वसाधारण भाव ७६० रुपये होता.
लाल कांद्याची आवक ११० ट्रॅक्टर/ पिकअपमधून झाली.लाल कांद्याला किमान भाव ५०० रुपये, कमाल १६३१, तर सर्वसाधारण भाव १३०० रुपये होते.सोयाबीनला किमान भाव २७००, कमाल भाव २८६१, तर सर्वसाधारण भाव २८३० रुपये
होता. गेल्या सप्ताहभर शेतमालाचे लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मका : किमान भाव ११३१, कमाल भाव १२४४, तर सर्वसाधारण भाव १२३० रुपये होते. बाजरी : किमान भाव १२५२, कमाल १९८०, तर सर्वसाधारण भाव १७२० रुपये होते. हरभरा : किमान भाव ७३०१, कमाल ७४०० रुपये होता. मूग : किमान भाव ३०००, कमाल भाव ४५००, तर सर्वसाधारण भाव ४४०० रुपये होते.लासलगाव येथील मुख्य आवारावरील शेतमालाचे लिलाव शुक्र वारी पूर्ववत झाल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी ज्याच्या नावावर बॅँकेचे खाते आहे त्याच्या पासबुकची झेरॉक्स तसेच सदर बॅँकेच्या आयएफसी कोडसह सदर
शेतमाल विक्र ीसाठी आणावा.
तसेच विक्रीनंतर रक्कम धनादेशाने अगर एनएफटीच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात येईल, असेही होळकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर लासलगावसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलाव मंगळवारपर्यंत (सात दिवस) बंद राहिल्याने कोट्यवधींचे लिलाव ठप्प झाले होते. ते पूर्ववत सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Laalgawy farmer's auction begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.