ताहाराबाद महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:37 PM2020-01-01T23:37:35+5:302020-01-01T23:38:16+5:30

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय ताहाराबाद यांचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर केरसाणे येथे आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिरात केरसाणे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वच्छता, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान तयार करून परिसरातील स्वच्छता केली.

Labor Conclave Camp of Taharabad College | ताहाराबाद महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

ताहाराबाद विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरप्रसंगी उत्कृष्ट स्वयंसेवकांचा गौरव करताना डॉ. तुषार शेवाळे. समवेत डॉ. गणेश लिंबोळे व सहायक प्रा. नीलेश निकम, भीमराव खांडवी, रामचंद्र खैरनार, देवा दळवी आदी.

Next

ताहाराबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय ताहाराबाद यांचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर केरसाणे येथे आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिरात केरसाणे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वच्छता, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान तयार करून परिसरातील स्वच्छता केली.
गाव शिवार लगत असलेल्या डोंगरपायथ्याशी पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्र मांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एकूण ३४४ फूट लांबीच्या २८ चर खोदून तयार केल्या तसेच केरसाणे गावात मातीचा बंधारादेखील विद्यार्थ्यांनी तयार केला. यासोबतच ग्रामपंचायत परिसर, हनुमान मंदिर, अंगणवाडी यांचीही स्वच्छता करण्यात आली. केरसाणे व दसाणे या दोन्ही गावात स्वच्छता करून स्वच्छतेसंदर्भात गावात प्रबोधन करण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीएचा विद्यार्थी सुदर्शन महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्र माची सांगता डॉ. तुषार शेवाळे, अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातील एका घरात वास्तव्यास राहून त्या घरची सर्व कामे करून श्रमाचे संस्कार घेणे तीसुद्धा करता येण्यासारखी गोष्ट आहे याबाबत विद्यार्थ्यांना विचार करण्याचा सल्ला डॉ. शेवाळे यांनी दिला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातील सात दिवसांच्या कार्याचा आढावा प्राचार्य डॉ. एम. एल. साळी यांनी प्रास्ताविकातून करून दिला. या कार्यक्र मात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून यश भामरे, शाहरूख शेख, गायत्री चित्ते, तनुजा मोरे यांना गौरविण्यात आले.

Web Title: Labor Conclave Camp of Taharabad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.