वडझिरे येथे सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:22 PM2019-05-02T18:22:42+5:302019-05-02T18:23:04+5:30
सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला.
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला. यामुळे वडझिरेकरांच्या उत्साहात भर पडली. या महाश्रमदानासाठी मुंबई, पुणे आदी शहरांसह परदेशातून आलेल्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले.
पानी फाउंडेशनचे सीओ तसेच लगान चित्रपटाटाचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ, माझ्या नवऱ्याची बायको फेम (राधिका) अनिता दाते, जशराज जोशी, लोकप्रिय गायक श्रानंदी जोशी, कोकण विभाग जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, टाटा पॉवर मुंबईचे कर्मचारी एस. एस. के. पकोड स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, वडझिरे जिल्हा परिषद शेळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आदींसह अनेक स्वयंसेवी संस्था, कर्मचारी व अधिकारी महाश्रमदानासाठी उपस्थित होते.
गतवर्षी वडझिरे गावात महाश्रमदान आयोजित केले होते. त्यावेळी ग्रामस्थांचा प्रतिसाद बघता रात्रंदिवस मेहनत घेवून पानी फाउंडेशन टीम व ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी महाश्रमदानाची तयारी केली. सत्यजित भटकळ व अनिता दातेसह मनिषा पलांडे यांनी वडझिरे गावात श्रमदानासाठी आल्यावर ग्रामस्थांचा प्रतिसाद बघता ग्रामस्थांचे कौतुक केले.
महाराष्टÑ दुष्काळात होरपळत असताना शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय पानी फाउंडेशनचे काम काही गावांमध्ये जोमाने सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्याचे महत्व समजले असून पाणी कोण देणार तर मी देणार अशा दुष्काळाशी दोन हात करण्यास अनेक सेलिब्रेटी, छोट्यामुलांसह जलमित्र श्रमदानासाठी उपस्थित झाले होते. सलग तीन दिवस सुट्या असल्याने कुठलीही पिकनिक न करता आपल्याला जो अन्न पिकवतो त्या शेतकरी राजाला पाण्याला अन्न पिकवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते मिळवून देण्यासाठी अनेक जलमित्र श्रमदानासाठी पुढे सरसावले होते. वडझिरे ग्रामपंचायतीच्या वतीने जलमित्रांना साहित्य, पिण्याचे पाणी व अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. नायगाव येथील वैद्यकीय विभागाने जलमित्रांच्या सेवेसाठी मदत केली. या महाश्रमदानात नववधू म्हणून बोहल्यावर उभी राहण्याआधी वैशाली भाऊसाहेब बोडके परिवारासह महाश्रमदानात सहभाग घेतला.
पानी फाउंडेशनच्या वतीने सत्यजित भटकळ व अनिता दाते यांच्या हस्ते बोडके हिचा वृक्षाची हुंडी देवून सत्कार करण्यात आला. महाश्रमदान यशस्वीतेसाठी सरपंच शोभा बोडके, उपसरपंच छाया नागरे, ग्रामपंचायत सदस्य संजय नागरे, तुषार आंबेकर, अलका बोडके, रेखा बोडके, मंदा ठोंबर, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, आर. बी. बोडके, विलास बोडके, भिमराव दराडे, मनोहर बोडके, अप्पा दराडे, वसंत बोडके, गंगा बोडके, सोमनाथ बोडके, विश्वनाथ बोडके, अशोक बोडके, नारायण क्षीरसागर, देविदास कुटे, संदीप आंबेकर, राहुल चव्हाण आदींसह मुख्याध्यापक महिला, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
४यात ३ हजार जलमित्रांनी श्रमदानासाठी आॅनलाईन रजिट्रेशन करून श्रमदान केले. वडझिरे गावातील ८०० जलमित्रांनी या महाश्रमदानात आपला खारीचा वाटा उचलला. महाश्रमदानासाठी आलेल्या काही जलमित्रांनी पानी फांऊडेशनच्या कामासाठी आर्थिक मदत केली.