नांदगावला श्रमसंस्कार शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 03:59 PM2020-01-06T15:59:35+5:302020-01-06T16:00:05+5:30

नांदगाव: श्रीरामनगर प्लास्टिक मुक्त करा तसेच प्रामाणकिपणे काम करु न श्रमाला प्रतिष्ठा मिळवुन देण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजनेत असल्याने स्वयंसेवकांनी शिक्षणाबरोबरच श्रमाचे महत्व जाणुन घ्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी केले. ते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर श्रीरामनगर येथे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

   Labor Fellowship Camp at Nandgaon | नांदगावला श्रमसंस्कार शिबीर

नांदगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मार्गदर्शन करतांना पोलीस उपनिरीक्षक दळवी, व्यासपीठावर प्रा. गढरी, अतुल निकम, पाटील, पटेल,संतोष मुटकुळे, नारायणे, शेळके आदी.

Next
ठळक मुद्दे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सरपंच दत्तात्रय खैरनार, संजय मोरे, मारु ती जगधने, संतोष कांदे, किरण काळे, भगवान सोनवणे, सागर फाटे,महेश गायकवाड, अतुल निकम,पंकज देवकाते, उपप्राचार्य संजय मराठे, आदि व्यासपीठावर

कार्यक्र म अधिकारी प्रा.व्ही. पी.गढरी यांनी शिबीर काळात घेतल्या जाणाº्या उपक्र मांची माहिती दिली. पर्यावरण सुरक्षित राहाण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नशील राहावे असे सागर फाटे म्हणाले तर नांदगाव भयमुक्त करण्याची सुरवात महाविद्यालयीन युवक व युवतींपासुन करु , तुम्ही सुरिक्षत रहावे हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही वाहतूकीचे व कायद्याचे नियम पाळा असे पो.उपनिरीक्षक परशुराम दळवी मनोगतात म्हणाले. यावेळी मारु ती जगधने व भगवान सोनवणे यांनी शिबीरास शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन सुरेश नारायणे यांनी केले. आर.एल.दिवटे यांनी आभार मानले.

 

 

Web Title:    Labor Fellowship Camp at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.