मजूरांच्या स्थलांतराचा कंपन्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:18 PM2020-05-20T16:18:36+5:302020-05-20T16:18:43+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांकडे पाहिले जाते, परंतु लाँकडाऊन घोषित केल्यापासून जवळजवळ दोन महिने होत आले, परंतु कोरोनाच्या स्थितीमध्ये गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच कंपन्या चालू न झाल्यामुळे मजूर व कामगारांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात ४० ते ४५ कंपन्या आहेत.त्या कंपन्यामध्ये जवळजवळ ७० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. हे सर्व मजूर ठेकेदारी पध्दतीवर काम करतात. कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगारांना घरबसल्या वेतन दिले गेले. परंतु ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या मजूरांना वेतन न मिळाल्याने हलाखीचे जीवन जगावे लागले. त्यामुळे या परप्रांतीय मजूरांवर उपासमारीची स्थिती निर्माण झाली. घरी असल्याने, तसेच कंपनी बंद असल्याने या मजूरांना वेतन मिळाले नाही. जे घरात पैसे होते तेही या दिड महिन्यात संपून गेले. लखमापूर व परिसरात भरपूर कंपन्या आहेत. जेव्हा कोरोना व लाँकडाऊन नव्हता तेव्हा जवळजवळ ८० ते ९० टक्के कंपन्या चालू स्थितीत होत्या. बरेच कामगार, मजूर कामावर काम करून आपल्या कुठूंबाचे पालनपोषण करीत होते, पण आता मात्र एक मजूर रस्त्यावरु न दिसत नाही. जर एखादा कामगार रस्त्यावर दिसला तर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देऊन प्रवास करावा लागतो, या सर्व कारणांमुळे लखमापूर व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर परप्रांतीय मजूरांच्या स्थलांतरामुळे मजूर टंचाईची कुºहाड कोसळली आहे ,त्यामुळे यंदाच्या वर्षी अनेक कंपनीचे बाँयलर पेटणार नाही असे संकेत प्राप्त होत आहे.