कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:47 PM2018-11-15T16:47:33+5:302018-11-15T16:47:54+5:30
खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.
खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.तसेच परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून कांदा या पिकाकडे हमखस पैसा देणारे पिक म्हणून पाहिले जात आहे .त्यामुळे प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करतो. गेल्या चार-पाच वर्षापूवी कोकणातील आदिवासी त्याच्याकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ होळी नंतर ते उन्हाळी कांदा लागवडीच्या वेळेस दरवर्षी येत आसे .परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कोकणी मजूर आता मार्केट मघील व्यापाराच्या खळयावर सावलीत कांदाच्या गोणी भरण्यासाठी जात असल्याने खामखेडा ,भऊर,सावकी,पिळकोस,आदि परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.तसेच सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू आसल्याने स्थानिक गावातील मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्याला परगावाहुंन मजूर आणणाº्या रिक्षा किंवा टेंपो चालकाच्या सपर्क त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी येत . आता गावातील पूर्वी मजुरी करणारे मजुर आता तेही बागायती शेती करु लागल्याने त्याच्याकडे रोजगार उपलब्ध झाल्याने तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात.
सध्या गावात मालेगाव तालुक्यातील सोनेज येथिल पन्नास की.मी.अंतराहुन मजूर कांदा काढणी कामासाठी येथ आहे. चालु वर्षी या काही भागामध्ये अल्पशा पावसामुळे विहीरीलापाणी नसल्याने त्या भागात शेतीचे कामे नाहीत तेव्हा ते कामासाठी येतात .जा गावातील मजूर कामासाठी येतात तेथील वाहनचालकलवकर सकाळी दहा वाजेपर्यत शेतात सोडतो व सायंकाळी पाच वाजेपर्यत कामे करीतात.आणि पुन्हा सायंकाळी घरी सोडतो.म्हणजे हे मजूर सकाळी सात वाजता घराबाहेर निघुन पुन्हा सायंकाळी सात वाजता घरी जातात.हा वाहनचालक मजूर ज्या शेतकºयाने सागतले असते त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतो.काही वाहन चालक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात.तेव्हा त्यांना वाहन भाडे व त्यांच्या अतरिक्त मंजूरी मिळते.काही वाहनधारक दोन मजुराच्या टोळ्या करतात आ िणदोन शेतकºयाकडे मजूर सोडतात तेव्हा त्याला दोन ठिकाणचे अलगअलग भाडे मिळते त्यामुळे वाहनधारकाचा फायदा होतो.तेव्हा आता स्थानिक मजुरांपेक्षा बाहेरगावाचे मजूर मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे.