कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:33 AM2018-05-11T01:33:59+5:302018-05-11T01:33:59+5:30
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले.
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. कंत्राटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन कायदेशीर असल्याचे आणि कुणीही कायदा हातात घेतला नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना कारवाई थांबवावी लागली. असे असले तरी शुक्रवारी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी याप्रकरणी चर्चा होणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. गेल्या एक तारखेपासून आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी रोजगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी उपोेषणकर्त्यांची भेट घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाºयांप्रकरणी तोडगा निघेल असे वाटत असतानाच कुलसचिव, प्रशासन अधिकारी आणि विधी अधिकाºयांनी परस्पर जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. विद्यापीठाने अचानक भूमिका बदलल्याने कंत्राटी कर्मचारी संभ्रमात असून, विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त करीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्र्धार केला. मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, पोलिसांचा फौजफाटा तसेच अतिक्रमण विभागाच्या वाहनासह आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आंदोलन बंद करावे, असे उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी कॉम्रेड श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, अॅड. भूषण साबळे यांनी पोलिसांना आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे सांगत आंदोलनाचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याने पोलीस नरमले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी कॉमे्रड श्रीधर देशपांडे यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी याप्रकरणी चर्चा करून निर्णय घेण्याचा तोडगा काढला.
देशपांडे यांच्या गाडीला अपघात
आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाट्यासह आल्याचे समजताच कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे महात्मानगर येथून आंदोलनाच्या ठिकाणी येत असताना कुलकर्णी गार्डनजवळ त्यांची गाडी दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. त्यांना किरकोळ इजा झाली. यावेळी त्यांनी उपचार न करता गाडी तेथेच सोडून उपोषण स्थळ गाठण्यास प्राधान्य दिले.