दीपालीनगर परिसरात आधार कार्ड केंद्राची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:22+5:302021-02-24T04:15:22+5:30
दीपालीनगर , सुचितानगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहातात. त्यांना आधारकार्ड अपडेशन करण्यासाठी इतरत्र जावे लागते. सध्या अनेक याेजनांसाठी आधारकार्ड ...
दीपालीनगर , सुचितानगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहातात. त्यांना आधारकार्ड अपडेशन करण्यासाठी इतरत्र जावे लागते. सध्या अनेक याेजनांसाठी आधारकार्ड अपडेट करावे लागत असल्याने केंद्रांवर गर्दी देखील होत आहे. जेथे केंद्र एखादे दुसरे आहे तेथे होणारी गर्दी आणि लागणारा वेळ यामुळे अन्य केंद्र शोधण्याची वेळ नागरिकांवर येते. या परिसरात आधार कार्ड केंद्राची संख्या अपुरी असल्याने गैरसोय होत आहे.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आता आधार कार्ड आवश्यक आहे आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड केंद्रावर ये-जा करावी लागते. त्यासाठी पाथर्डी गाव , सिडको महापालिका किंवा शहरात ये जा करावी लागते. त्यामुळे दीपालीनगर परिसरात आधार कार्ड केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे