आधार कार्ड केंद्रांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:31 AM2019-11-25T00:31:24+5:302019-11-25T00:33:14+5:30

नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 Lack of Aadhar Card Centers | आधार कार्ड केंद्रांची कमतरता

आधार कार्ड केंद्रांची कमतरता

Next

इंदिरानगर : नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नासर्डी ते पाथर्डीदरम्यान भारतनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, सार्थकनगर, शरयूनगरी, सराफनगर, ज्ञानेश्वरनगर, संत नरहरीनगर यांसह विविध उपनगरे आहेत. यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट व सोसायट्या वाढत आहेत. लोकवस्तीच्या मानाने परिसरात दोनच आधार कार्ड केंद्र आहेत. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड केंद्रावर ये-जा करावी लागते. त्यासाठी पाथर्डीगाव, सिडको महापालिका किंवा शहरात ये-जा करावी लागते. यामुळे परिसरातील नागरिकांना वेळ व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी जाऊनसुद्धा लांबच लांब रांगा असल्याने कित्येक वेळेस विद्यार्थ्यांना शाळेला अघोषित सुट्टी घ्यावी लागत आहे.

Web Title:  Lack of Aadhar Card Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.