नांदगाव तालुक्यात मूलभूत सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:35+5:302020-12-04T04:37:35+5:30
बोलठाण व न्यायडोंगरी येथे दोन आउट पोस्ट आहेत. येथे प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असतात. बोलठाण स्वातंत्र्यपूर्व ...
बोलठाण व न्यायडोंगरी येथे दोन आउट पोस्ट आहेत. येथे प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असतात. बोलठाण स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारच्या अमलाखाली; परंतु ब्रिटिश व निजामशाहीच्या सरहद्दीवर असलेले गाव असल्याने येथे पोलीस निवासस्थाने मोठ्या प्रमाणावर होती. आज ती अस्तित्वात नाही. परंतु तत्कालीन पोलीस चौकी मात्र दुरुस्ती केलेल्या स्वरूपात चांगल्या स्थितीत आहे.
याशिवाय नांदगाव टाउन, टाकळी व हिसवळ याठिकाणी पोलीस बिट आहेत. या गावांना दहा ते बारा गावे जोडलेली आहेत. दररोज पोलीस त्याठिकाणी जाऊन काम करतात. वरील सर्व ठिकाणी काम करताना पोलिसांना पाणी घरून घेऊन जावे लागते किंवा जार मागवावे लागतात. बोलठाण व न्यायडोंगरी या दोन्ही ठिकाणी पोलिसांसाठी संलग्न शौचालयांची व्यवस्था नाही.
पोलीस बळ संख्येने पुरेसे आहे. निवासस्थाने कमी आहेत; पण लवकरच नवीन ठिकाणी पोलीस स्टेशन स्थलांतरित होणार असून, त्याच्याजवळ पुरेशी निवासस्थाने बांधण्याची योजना व आराखडा तयार आहे.
संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक
फोटो : ३० न्यायडोंगरी पोलीस चौकी